Uncategorized

मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटीलची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी

  सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित केलेल्या विभागस्तरीय शालेय जलतरण (ब्रेस्टस्ट्रोक ५०मीटर, १००मीटर, २००मीटर द्वितीय) स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील आर्यवीर अश्विनकुमार पाटील(इयत्ता ११वी वाणिज्य, १७ वर्षे वयोगट) प्रथम क्रमांक मिळवून अमरावती येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. सुजाता भोईटे यांनी अभिनंदन केले.

 यशस्वी खेळाडू विद्यार्थ्याला प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप, सुप्रिया काकडे देशमुख-पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *