बारामती विधानसभा पवार विरुद्ध पवार होणार असल्याची चर्चा.
संपादक- मधुकर बनसोडे.
नुकत्याच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याची चर्चा बारामती करांमधून होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला लोकसभेला तालुक्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे बारामती मधून जवळपास 48 हजार मतांची पिछाडी सोसावी लागली होती? लोकसभेची पुनरुक्ती विधानसभेला देखील होणार असल्याची चर्चा बारामती तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. सध्या तरी दोन्ही गटातील नेत्यांनी बारामती विधानसभेची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही गटांकडून बारामती तालुक्यातील महिला मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे काम बारामती तालुक्यात सुरू आहे.? मात्र जनता आता इतकी हुशार झाली आहे दोन्ही गटांकडून फायदा करून घेऊन तिसऱ्याच उमेदवाराला विजय करते की काय? अशी देखील चर्चा बारामती तालुक्यात होत आहे कधी नव्हे ते पहिल्यांदाच बारामती विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदर राष्ट्रवादी शरद पवार गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून बारामती मध्ये वारंवार गाठीभेटी चर्चासत्र सुरू झाली.
त्यामुळे बारामती तालुक्यातील मतदार राजाला कधी नव्हे ते वेटेज आले असे देखील तालुक्यातील नागरिकांमधून बोलले जात आहे. अजित पवार यांचा बारामती मध्ये दौरा असताना काही नागरिकांनी अजित पवार यांचा ताफा अडवून बारामती विधानसभेसाठी आपणच उमेदवार असले पाहिजेअसा आग्रह धरला. पक्षाने देखील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत. जवळपास अजित पवार यांची बारामती विधानसभेची सीट फायनल केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. बारामती विधानसभा नक्कीच यावेळेस रंगीत दार होणार असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेची पुनरुक्ती कायम ठेवणार. कि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विधानसभेला बाजी मारणार. हे निवडणूक झाल्यानंतर समोर येईलच.
अजित पवार हे त्यांच्या कामासाठी रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे तो अजित पवार यांनीच केला आहे असे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जाते मग अजित पवार यांना बारामती तालुक्यामध्येच वारंवार गाठीभेटी का घ्याव्या लागत आहेत असे देखील नागरिकांमधून बोलले जात आहे.?