Uncategorized

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी सुधीर गायकवाड व उपाध्यक्षपदी शिवाजीराव शेंङकर यांची बिनविरोध निवड.

प्रतिनिधी
करंजेपूल गावच्या विध्यमान सरपंच पुजाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवङ प्रक्रिया पार पङली.
करंजेपूल गावातील चौघेजण अध्यक्षपदासाठी इच्छुक होते.
परंतु माजी तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड यांनी बिनविरोध निवड करण्यात मोलाचे सहकार्य केले. गावातील वातावरण शांत राहावे या उद्देशातून
सदरील निवङणूक चिठ्ठी टाकून करण्यात आली.सहा महिन्यासाठी पदाधिकारी निवङ राहिल.
प्रथम चार चिठ्ठ्या टाकून प्रथम चिठ्ठी अध्यक्ष पदासाठी द्वितीय चिठ्ठी उपाध्यक्ष पदासाठी आशी निवङ प्रक्रिया करण्यात आली.
नंतर सहा महीन्यासाठी तृतीय चिठ्ठी मयुर शेंङकर यांची अध्यक्ष पदासाठी निघाली.चतुर्थ चिठ्ठी प्रशांतभैया रिठे यांची उपाध्यक्ष पदासाठी निघाली.
सर्व बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार ग्रामपंचायत सरपंच पुजाताई गायकवाड, उपसरपंच प्रविण गायकवाड, ग्रामसेविका सुजाता आगवणे, यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच वैभव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य निखिल शेंङकर,सुहास गायकवाड,निलेश गायकवाड,राजेंद्र गायकवाङ, प्रदिप शेंङकर, सचिन शेंङकर,राहूल शेंङकर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *